पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाढदिवशी आनंद परांजपे यांनी 'चौकीदार चोर है' केक कापला

आनंद परांजपे यांनी कापलेला केक (छायाचित्र - एएनआय)

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आनंद परांजपे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कापलेल्या एका केकमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'देश का चौकीदार ही चोर है' असे वाक्य लिहिलेला केक आनंद परांजपे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कापला. त्यांच्या या कृतीने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होऊ शकतात. एएनआयने हे ट्विट केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान येत्या रविवारी, १९ मे रोजी होते आहे. त्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होते आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है ही घोषणा देशभरात आपल्या प्रचारात वापरली होती. गेल्या काही महिन्यांपासून राफेल करारातील मुद्द्यांवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विविध आरोप केले आहेत. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून मोदींनी उघडपणे आपल्याशी चर्चेला यावे असे आव्हानही दिले होते. राहुल गांधी यांनी हा मुद्दा प्रचारात वापरायचे ठरविल्यावर दुसरीकडे भाजपनेही 'मै भी चौकीदार' मोहिम राबविली. भाजपच्या सर्वच समर्थकांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर नावाआधी चौकीदार हा शब्द वापरला होता. मोदींनीही आपल्या प्रचारसभांमध्ये मै भी चौकीदारचे नारे जमलेल्या लोकांकडून वदवून घेतले होते.

आनंद परांजपे यांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत हा केप कापला. त्यावर भावी खासदार असे सुद्धा लिहिण्यात आले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress NCP candidate from Thane Anand Paranjpe cut a cake on his birthday with Desh ka Chowkidaar Hi Chor Hai written on it