पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर; मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार

राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि काँग्रेस नेते विजय वेडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या मध्यस्थीनंतर वडेट्टीवारांची नाराजी दूर झाली आहे. विजय वडेट्टीवार यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांना मदत व पुनर्वसन खातं देण्यात आले आहे. 

गौरी लंकेश हत्येप्रकरणी आरोपी ऋषिकेश देवडीकरला बेड्या

मंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मला माझ्यापेक्षा या मंत्रीपदाचा उपयोग राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना झाला पाहिजे हा उद्देश आहे. पक्षाविरोधात नाराजी नव्हती, पण मदत व पुनर्वसन खात्यासाठी मी आग्रही होतो. सर्वस्वी निर्णय हायकमांडचा असतो. आता मी समाधानी आहे, असे त्यांनी सांगितले. 

'इंटरनेट सुविधा मूलभूत अधिकारी, काश्मिरातील निर्बंधांचा फेरविचार करा'

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या दिल्लीवारीत विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर झाली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करुन बाळासाहेब थोरात यांनी वडेट्टीवार यांच्याशी फोनवरुन बोलणं केले. त्यानंतर वडेट्टीवार यांची नाराजी दूर झाली असल्याचे सांगितले जात आहे. 

सत्तेचे टॉनिक संपल्यामुळे सूज उतरली, शिवसेनेची भाजपवर

महाविकास आघाडीत समाधानकारक खाते न मिळाल्याने विजय वडेट्टीवार नाराज झाल्याचे पहायला मिळत होते. गेल्या ५ दिवसांपासून वडेट्टीवार यांचा फोन नॉट रिचेबल लागत होता. काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते. तसंच मुख्यमंत्र्यांकडून त्यांना खातं बदलण्याचे आश्वासन सुध्दा देण्यात आले होते. अखेर वडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश आले आहे.

जनगणना अधिकारी 'तुम्ही काय खाता' असाही प्रश्न विचारणार