पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मिलिंद देवरांचे ते ट्विट, नरेंद्र मोदींचे कौतुक, आणि....

मिलिंद देवरा

अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये झालेला हाऊडी मोदी कार्यक्रम आणि त्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण या दोन्हीचे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी ट्विटरवर कौतुक केले होते. विशेष म्हणजे त्यांच्या या ट्विटला खुद्द नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले असून, त्यांनी मिलिंद देवरा यांचे आभार मानले आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मिलिंद देवरा यांनी याआधीही कलम ३७० रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले होते.

साताऱ्यांची पोटनिवडणूक जाहीर, असा आहे निवडणूक कार्यक्रम

आपल्या ट्विटमध्ये मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे की, ह्युस्टनमध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण हे भारताच्या सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीचे उत्तम उदाहरण आहे. भारत आणि अमेरिकेतील दृढ संबंधांबद्दल माझे वडील मुरलीभाई देवरा खूप आधीपासून प्रयत्नशील होते. डोनाल्ड ट्रम्प यांचे आदरातिथ्य आणि अमेरिकेच्या प्रगतीमध्ये तेथील भारतीयांचे योगदान असल्याचे त्यांनी मान्य करणे याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे.

मिलिंद देवरांच्या ट्विटला उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी त्यांचे आभार मानले आहेत. ते म्हणतात, भारत आणि अमेरिकेतील दृढ संबंधांबद्दल माझे मित्र मुरली देवरा यांनी दिलेल्या योगदानाचा तुम्ही केलेला उल्लेख एकदम बरोबर आहे. दोन्ही देशांमध्ये संबंध अधिक घट्ट झाल्याचे पाहून त्यांना निश्चितच आनंद झाला असता. डोनाल्ड ट्रम्प यांचे आदरातिथ्य खरोखरच कौतुकास्पद आहे.

तृतीयपंथी मतदार नोंदणीमध्ये मुंबई उपनगर आघाडीवर

यानंतर मिलिंद देवरा यांनी पुन्हा एकदा मोदींना प्रतिसाद देत म्हटले आहे की, अमेरिकेतील डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन पक्षांच्या मित्रांशी चर्चा करताना त्यांनी देशातील २१ व्या शतकातील नेतृत्त्वाचे कौतुक केले आहे.