पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना पुन्हा तिकीट देण्याच्या तयारीत

महाराष्ट्र काँग्रेस

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून पक्षाच्या सध्याच्या सर्व आमदारांना पुन्हा तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीमध्ये झालेल्या पक्षाच्या निवड समितीच्या बैठकीत गुरुवारी यावर चर्चा झाली. सध्या विधानसभेमध्ये पक्षाचे जेवढे आमदार आहेत. त्या सर्वांना पुन्हा एकदा तिकीट दिले जाण्यावर निवड समितीमध्ये सहमती झाल्याचे समजते.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ४२ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस ४१ जागांवर विजयी झाला होता. त्यावेळी हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एका मागून एक नेते भाजप आणि शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षाने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

चांद्रयान २ साठी महत्त्वाचा क्षण, विक्रम लँडर शनिवारी चंद्रावर उतरणार

काँग्रेसच्या निवड समितीच्या बैठकीत राज्यातील ५० ते ६० जागांसंदर्भातील चर्चा पूर्ण झाली आहे. यामध्ये कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यावर चर्चा झाली. चव्हाण याच मतदारसंघातून निवडून आले आहेत. नांदेडमधील विधानसभेच्या जागेवरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. गेल्यावेळी या मतदारसंघातून अशोक चव्हाण यांची पत्नी अमिता चव्हाण विजयी झाल्या होत्या.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी निवड समितीची बैठक बोलावण्यात आली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे हे या समितीचे प्रमुख आहेत. पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. 

तिहारमध्ये चिदंबरम यांना कोणत्याही विशेष सुविधा नाही, फक्त...

एका ज्येष्ठ नेत्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, एकूण १०० मतदारसंघांवर बैठकीत चर्चा कऱण्यात आली. त्यापैकी ६० मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. सध्याच्या सर्व आमदारांना पुन्हा तिकीट देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच आम्ही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहोत.