पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ता स्थापनेचा तिढा कायम; काँग्रेस नेते सोनिया गांधीची भेट घेणार

सोनिया गांधी

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १४ दिवस झाले तरी सुध्दा राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा काही सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेवरुन सुरु असलेल्या वाद काही संपेना. अशामध्ये सत्ता स्थापनेचा पार्श्वभूमीवर राज्यासह दिल्लीमध्ये हालचालिंना वेग आला आहे. राज्यामध्ये पुन्हा भाजप नको अशी काँग्रेसच्या काही नेत्यांची इच्छा आहे. राज्यात काँग्रेस शिवसेनाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुध्दा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अशामध्येच काँग्रेसचे नेते दिल्लीला जाऊन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.  

गृहनिर्माण क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय

राज्यामध्ये काँग्रेसमधील एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री नको. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे अशी काही काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आहे. हीच भूमिका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे मांडण्यासाठी राज्यातील काँग्रेसचे नेते गुरुवारी संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत. सोनिया गांधी यांची भेट घेऊन ते शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतची भूमिका त्यांच्यासमोर मांडणार आहेत. 

'शिवसेनेचा मुख्यमंत्री हीच ती गोड बातमी'

दरम्यान, बुधवारी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी राज्यात कोणत्याही स्थितीत भाजपचे सरकार येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यासाठी सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सुध्दा राज्यात बिगर भाजप सरकार येणं ही काँग्रेसची इच्छा असल्याचे वक्तव्य केले होते. यासंदर्भात शिवसेनेने भूमिका घ्यावी असं आवाहन त्यांनी केले होते. 

सत्तासंघर्ष : मुख्यमंत्र्यांशिवाय भाजप नेते राज्यपालांना भेटणार