पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही आमच्या आमदारांना कुठेही हलवले नाही: विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार

राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेचा वाद सुरुच आहे. आपले आमदार फुटू नये यासाठी शिवसेनेने सर्व आमदारांना मुंबईतील रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवले आहे. काँग्रेसला सुध्दा आमदार फुटण्याची भिती वाटू लागल्यामुळे काँग्रेस आपल्या आमदारांना जयपूरला हलवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. मात्र आम्ही आमच्या आमदारांना कुठेही हलवले नाही, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

कोणाच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही, संजय राऊत यांचे वक्तव्य

आमदार फुटू नये यासाठी काँग्रेस आपल्या आमदारांना जयपूर येथे हलवणार आहे. जयपूरला जाण्याची काँग्रेसकडून व्यवस्था सुध्दा केली जाणार आहे अशा चर्चा सुरु आहेत. याविषयावर बोलताना वडेट्टीवारांनी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये  सांगितले की, आम्ही आमच्या आमदारांना कुठेही हलवले नाही. आमचे सर्व आमदार त्यांच्या ठिकाणी आहेत. जर ते दुसऱ्या ठिकाणी गेले असतील तर ते कदाचित वैयक्तिक कामासाठी गेले असतील, असे विजय वडेट्टीवर यांनी सांगितले.

दिल्लीतील तीस हजारी कोर्टातील त्या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी एबीपी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपवर गंभीर आरोप केले आहे. भाजपकडून आमदारांना फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवसेना आमदाराला भाजपने ५० कोटींची ऑफर दिली असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसंच भाजपकडून काँग्रेस आमदारांनाही प्रलोभनं दाखवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.   

मोदी सरकारला झटका, मूडीजकडून आर्थिक रेटिंगमध्ये 'नकारात्मक'