पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अंदमानात जाऊन राहण्याचा सल्ला देणाऱ्यांनीच तिथे जावे'

सचिन सावंत

अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा इतरही शेकडो लोकांनी भोगलेली आहे. त्यांचे बलिदान, त्याग, समर्पण लक्षात घेता त्यांनाही भारतरत्न द्यावा लागेल, असा टोला काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तसंच, आम्हाला अंदमानात जाऊन दोन दिवस राहण्याचा सल्ला देणाऱ्यांनीच अंदमानात जावे, असे देखील त्यांनी म्हटले आहे. 

'डॉ. आंबेडकर स्मारकाला माझा विरोध, तो निधी वाडिया रुग्णालयाला द्या'

भाजपाला सावरकरांना भारतरत्न देण्यास कोणी रोखले आहे? असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यावरुन चर्चा सुरु असून केंद्रामध्ये मोठ्या बहुमताचे भाजपचेच सरकार आहे. विरोधकांची तमा न बाळगता भाजप सावरकरांना भारतरत्न देऊ शकतात. मात्र गेली ११ वर्षे सत्तेत असणाऱ्या भाजपला ते जमले नाही अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.  

'मेगाभरतीचा निर्णय कोअर कमिटीचा, माझ्या एकट्याचा नाही'

सचिन सावंत यांनी पुढे असे सांगितले आहे की, 'सावरकर समर्थकांनाच इतिहासाची उजळणी करण्याची गरज आहे. अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगणारे १९०९-२१ या कालावधीत १४९, तर १९२२ ते ३१ याकाळात ३० आणि १९३२ ते १९३८ याकाळात ३८६ लोकं होती. यामध्ये योगेश शुक्लासारख्या अनेकांनी शिक्षा भोगून गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चळवळीत भाग घेतला होता. माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या या सर्वांना भारतरत्न द्यावा लागेल, असे सावंत यांनी सांगितले. 

'...तर राहुल गांधींना सर्वात आधी अंदमानच्या तुरुंगात पाठवावे लागेल'

सावरकर समर्थकांनी अंदमान जेल जाऊन नुसते पाहिले तर माफी न मागणाऱ्या आणि प्राणांची आहुती देणाऱ्या या अनेक महान सुपुत्रांच्या त्यागाचे महत्व कळेल. आम्हाला अंदमानात जाऊन दोन दिवस राहण्याचा सल्ला देणाऱ्यांनीच अंदमानात जावे, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.  या शेकडो सुपुत्रांच्या त्यागाची, समपर्णाची, बलिदानाची माहिती त्यांना कळेल आणि ती त्यांना कळणे गरजेचे आहे, असे सचिव सावंत यांनी सांगितले. 

लोकलमध्ये केवळ रविवारी चोरी करणाऱ्या सोनसाखळी चोरास अटक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress leader sachin sawant says those who suggest staying in andaman should go to andaman