पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सीजे हाऊस व्यवहार प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून चौकशी

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याप्रकरणी ईडीने त्यांना नोटीस पाठवत १८ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर रहाण्याचे आदेश दिले होते. वरळी येथील सीजे हाऊसमधील त्यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटच्या खरेदी व्यवहाराबाबत ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. 

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन जाधवांविरोधात गुन्हा दाखल

प्रफुल्ल पटेल यांचे सीजे हाऊसमध्ये दोन फ्लॅट आहेत. हे फ्लॅट गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या मालकिचे असून ते प्रफुल्ल पटेल यांनी विकत घेतल्याचा संशय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना आहे. २००७ मध्ये इक्बाल मिर्ची आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये सीजे हाऊसमधील या फ्लॅटच्यासंबंधी विकास करार झाल्याची माहिती समोर आली आहे. इकबाल मिर्ची हा दाऊद इब्राहिमचा हस्तक होता. 

सोनिया गांधींची प्रचारसभा रद्द, राहुल गांधी सभा घेणार