पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध

नाना पटोले

विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्ष पदावर नाना पटोले यांची निवड झाली आहे. ठाकरे सरकार दुसऱ्या परिक्षेमध्ये देखील पास झाले आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होईल: छगन भुजबळ

चंद्रकांत पाटील यांनी सांगिले की, काल रात्रीपासून सत्ताधारी पक्षाच्या सर्व नेत्यांनी भाजपशी संपर्क करण्यास सुरुवात केली होती. विधासाभा अध्यक्ष हे पद विवादात येऊ नये. त्यामध्ये चुरस होऊ नये असे त्यांनी आम्हाला सांगितले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.  याबाबत आज देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या परंपरेनुसार अध्यक्षांचे पद वादात आणायचे नाही. त्यामुळे किसन कथोरे याचा अर्ज मागे घेतला, असल्याचे त्यांनी सांगितले. 

विधानसभा अध्यक्ष पदासाठी पटोले विरुध्द कथोरे लढत

काँग्रेसचे नेते नाना पटोले हे साकोली विधानासभा मतदार संघाचे आमदार आहेत. ते भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये आले आहेत. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी पटोले २०१४ मध्ये भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीत भंडारा- गोंदिया मतदार संघात विजयी झाले होते. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. काही मुद्द्यांवरुन पक्षासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये भाजप आणि खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर ११ जानेवारी २०१८ रोजी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

१ डिसेंबरपासून हे ५ नियम बदलले; ज्याचा थेट परिणाम खिशावर