पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

माणिकराव ठाकरे आणि राज ठाकरे

दिल्लीच्या दरबारात मोदींच्या शपथविधीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असताना महाराष्ट्रात आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हालचाली सुरु केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोकसभेतील मानहानीकार पराभवानंतर काँग्रेससमोर विधानसभा निवडणूकीमध्ये चांगली कामगिरी करुन दाखवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. 

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

या परिस्थितीत काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी आज (गुरुवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून ही सदिच्छा भेट होती, असे माणिकराव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. या भेटी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.  

विधानसभेसाठी मनसेला सोबत घेण्यावरून विरोधकांमध्ये अद्याप एकमत नाही

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आणि मोदी-शहा यांच्याविरोधात प्रचार मोहीम राबवली होती. मनसेचा एकही उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नसताना राज ठाकरे यांनी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन भाजपची व्हिडिओच्या माध्यमातून पोलखोल केली होती. राज यांच्या आक्रमक अंदाजासोबत त्यांनी जनतेला दाखवलेल्या व्हिडिओमुळे लोकसभेचे तख्त बदलले, अशी चर्चा रंगली होती. मात्र , लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या संभांचा काँग्रेस राष्ट्रवादीला काहीच फायदा झाला नव्हता.