पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचा राजीनामा; भाजपच्या वाटेवर?

कृपाशंकर सिंह

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला एकाच दिवसामध्ये दोन धक्के बसले. उर्मिला मातोंडकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला आहे. दिल्ली येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा सूपूर्द केला. दरम्यान, बुधवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.  

काश्मीर भारताचेच! जिनेव्हात पाक परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ सप्टेंबर रोजी कृपाशंकर सिंह यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील त्यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले होते. तेव्हापासूनच कृपाशंकर सिंह काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. 

पक्षांतर्गत वादाचा बळी; उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसचा राजीनामा

तर, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये येऊन भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकरांनी आज काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया उर्मिला मातोंडकर यांनी दिली आहे. उर्मिला मातोंडकर पाठोपाठ कृपाशंकर सिंह यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकल्यामुळे मुंबई काँग्रेसचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

दरम्यान, काँग्रेसचे  दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश राज्यातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा धक्का देणारा आहे.  

काश्मीर भारताचेच! जिनेव्हात पाक परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य