पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुन्हा भाजपचे सरकार नको, हुसेन दलवाईंनी घेतली संजय राऊतांची भेट

हुसेन दलवाई

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधील सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला तिढा सुटत नसतानाच आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी बुधवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची 'सामना'च्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. राज्यात कोणत्याही स्थितीत भाजपचे सरकार येऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.

आता प्रियांका चतुर्वेदींकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

हुसेन दलवाई म्हणाले, भाजप सरकारच्या कार्यकाळात गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राची सर्व पातळ्यांवर अधोगती झाली. महाराष्ट्राचा क्रमांक १३ व्या स्थानी गेला आहे. शिक्षणामध्येही राज्याची अधोगतीच झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेनेही भाजपच्या बाजूने कौल दिलेला नाही. त्यांच्या जागा गेल्यावेळेपेक्षा कमीच झाल्या आहेत. त्यांनी खरंतर आता विरोधी पक्षात बसले पाहिजे.

मुनगंटीवार म्हणाले, हम साथ साथ है!

राज्यात बुधवारी सकाळपासून राजकीय घडामोडी वेगाने घडताहेत. बुधवारी सकाळी संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्याआधी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या सुद्धा पवारांच्या भेटीला गेल्या होत्या. दुसरीकडे दिल्लीत काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.