पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निष्ठेने वागायचे असल्यास भाजपशिवाय पर्याय नाही: हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. मी कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये आलो असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच निष्ठेने वागायचे असल्यास भाजपशिवाय पर्याय नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

पाक पुन्हा तोंडावर आपटले, लंकेच्या मंत्र्यांनी दिला दहशतवादाचा दाखला

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. १०० दिवसांत मोदींनी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या कामाने प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे की, मुख्यमंत्री आणि भाजपचे सरकार या राज्याला न्याय मिळवून देऊ शकेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. पक्ष जी काही जबाबदारी देईल ती मी पार पाडेल असे सांगत पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले. 

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी गोळीबार करत तरुणाचे केले

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशासाठी गेल्या ५ वर्षापासून वाट पाहत होतो असे सांगत हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळकटी मिळेल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कारकीर्द पाहता त्यांना पक्षाकडून योग्य सन्मान दिला जाईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये आले असते तर आता ते खासदार असते, असे मत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

वाहतूक नियम; दंड आकारणी सरकारची महसूल उत्पन्न स्किम