पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यापुढे असे विधान खपवून घेणार नाही; बाळासाहेब थोरातचा इशारा

बाळासाहेब थोरात

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कुख्यात गुंड करीम लाला यांच्या भेटीविषयी वक्तव्य करणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी इशारा दिला आहे. खासदार संजय राऊत यांनी केलेले विधान चुकीचे आहे. अशाप्रकराचे विधान पुन्हा होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी. आम्ही अशाप्रकारचे विधान यापुढे सहन करणार नाही, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस अंडरवर्ल्डची मदत घ्यायचे का?: फडणवीस

बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतले आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे. पण भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधाने करावीत. आमच्या महान राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही हे सर्वांनीच लक्षात ठेवावे, असे बाळासाहेब थोरात यांनी ठनकावून सांगितले. तसंच आम्ही ही बाब शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

संजय राऊतांकडून इंदिरा गांधी-करीम लाला भेटीचे वक्तव्य मागे

दरम्यान, इंदिराजी गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या. १९७५ सालामध्ये मुंबईतील आणि देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केले. मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले, असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तसंच, ज्या करीम लाला बद्दल बोललं जातंय त्याच्यासकट हाजी मस्तान, युसुफ पटेल सारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या इंदिराजींनी आवळल्या होत्या, असे देखील त्यांनी सांगितले आहे. 

BCCI च्या करारातून धोनी आउट! कोहली, रोहित अन् बुमराह A+ श्रेणीत