पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भाजपच्या जनविरोधी धोरणांचा झारखंडमध्ये पराभव'

बाळासाहेब थोरात

भाजप सरकारच्या ५ वर्षाच्या काळात झारखंडची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाली. खोट्या राष्ट्रवादाची अफूची गोळी, कलम ३७० चे भांडवल, नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि पाकिस्तान या सगळ्या मुद्द्यांवर राजकारण करून निवडणूक जिंकण्याचा मोदी आणि शहा यांचा प्रयत्न झारखंडमधील जनतेने हाणून पाडला आणि भाजपच्या जनविरोधी राजकारणाचा पराभव केला, असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

 

अवघ्या दोन वर्षात भाजपचे साम्राज्य निम्मे झाले; पहा नकाशा

२०१७ पासून देशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत कोणत्याही राज्यात भाजपला बहुमत मिळाले नाही. झारखंड राज्याची निर्मिती झाल्यापासून तेथे भाजप आघाडीचे सरकार अस्तित्वात होते. काँग्रेस पक्ष तिथे कधीही सत्तेत आले नाही. प्रथमच झारखंडमधून भाजप सत्तेबाहेर जाणार आहे आणि काँग्रेस आघाडीचे सरकार येणार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

'झारखंडमध्ये आजपासून नवा अध्याय सुरु होईल'

बाळासाहेब थोरात यांनी पुढे असे सांगितले की,  २०१४ च्या निवडणुकीत जवळपास ३७ जागा जिंकून बहुमताच्या जवळपास असणा-या भाजपकडे पाच वर्षात झारखंडचा विकास करण्याची नामी संधी होती. परंतु ५ वर्षात भाजप सरकारने झारखंडला पिछाडीवर नेले. मोदी-शहांनी झारखंडमध्ये प्रत्येकी ९ सभा घेऊन राज्याच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला, तो ही सपशेल अयशस्वी ठरला, असल्याची टीका त्यांनी केली आहे. 

झारखंड निकालानंतर शरद पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया

दरम्यान, देशपातळीवर आणखी एक राज्य भाजपच्या हातून गेल्याने काँग्रेस मुक्त भारताची घोषणा देणा-या भाजपला स्वतःच्या अस्तित्वासाठी लढावे लागेल. भाजपच्या जनविरोधी आणि विभाजनवादी धोरणांविरोधात देशात प्रचंड जनआक्रोश आहे, हे देशपातळीवर सुरु असलेल्या आंदोलनातून आणि आजच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. झारखंडमध्ये येणारे नवे सरकार गरीब, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, महिला, तरूण, विद्यार्थी यांचे असेल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. 

'झारखंडच्या जनतेने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला'