पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संग्राम थोपटेंचा योग्य वेळी सन्मान केला जाईल: बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नेत्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. अशातच काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी बुधवारी पुण्यातील काँग्रेस भवनात तोडफोड केली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, तीन पक्षांटे सरकार आल्यामुळे कमी मंत्रिपदं वाट्याला आली. संग्राम थोपटे यांचा योग्यवेळी योग्य सन्मान केला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

'जनतेने सरकारचा राजकीय सातबारा कोरा करुन घरी पाठवले पाहिजे'

बाळासाहेब थोरात यांनी पुढे असे सांगितले की, संग्राम थोपटे यांच्याशी माझे बोलणे झाले आहेत. ते काँग्रेसचे चांगले कार्यकर्ता आहेत. त्यांच्या मागीच पिढ्या काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. त्यांचे वडील मंत्रिमंडळात होते. काँग्रेस पक्ष कुटुंबासारखा आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आल्यामुळे कमी मंत्रिपदं वाट्याला आली. संग्राम थोपटे यांना मंत्रिपद देऊ शकलो नसलो तरी योग्य वेळी त्यांचा योग्य सन्मान केला जाईल असे त्यांनी सांगितले. 

माझी निष्ठा कुठं कमी पडली, भास्कर जाधवांचा सवाल

दरम्यान, मंत्रिपद न दिल्यामुळे संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी पुण्यातील दोन मजली काँग्रेस भवनातील खिडक्या, दरवाजांच्या काचा फोडल्या. त्यानंतर काँग्रेस भवनातील खुर्च्या, टेबल, टीव्हींची तोडफोड केली. यावेळी संग्राम थोपटेंच्या समर्थकांनी बाळासाहेब थोरात, संजय जगताप यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. संग्राम थोपटे काँग्रेससोबत  प्रामाणिकपणे राहिले. काँग्रेसने थोपटेंना डावल्याने काम केले असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

जे घडले ते चुकीचे आणि निंदनीय आहे: संग्राम थोपटे