पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नाथाभाऊंसारखी माणसं पक्षात आली तर आनंदच होईल'

बाळासाहेब थोरात

भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज असून ते वारंवार आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. नाराज खडसेंचे भाजपवर सतत हल्ले सुरुच आहेत. खडसे यांनी सोमवारी दिल्लीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. खडसे यांच्या भेटीगाठी सुरुच आहे. आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. अशामध्ये 'नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तम होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

काश्मीरमधील स्थिती सामान्य पण काँग्रेसची..., अमित शहांचे प्रत्युत्तर

बाळासाहेब थोरात यांनी पुढे असे सांगितले की,  'नाथाभाऊ आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे. त्यांची अहवेलना झाली हे आम्हाला देखील आवडले नाही.' दरम्यान, एकनाथ खडसेंकडून आम्हाला प्रस्ताव आला नाही. आम्ही देखील त्यांना काही प्रस्ताव दिला नाही. अशी माणसं पक्षात आली तर आनंदच होईल. पक्षाला आणखी बळकटी मिळेल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

निर्भया प्रकरण: चारही दोषींना फासावर लटकवले जाणार?

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी सोमवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. एकनाथ खडसे भाजपा नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. भाजप नेत्यांची भेट न घेताच ते मुंबईत परतले.

एअरटेलची वायफाय व्हॉईस कॉल सेवा भारतात सुरू