पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुंडाला महामंडळावर घेणाऱ्यांनी बोलूच नये, थोरातांचा फडणवीसांना टोला

बाळासाहेब थोरात आणि देवेंद्र फडणवीस

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कुख्यात गुंड करीम लाला यांच्या भेटीविषयी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला अनेक प्रश्न विचारत टीका केली आहे. याचसंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. 'गुंडाला महामंडळावर घेणाऱ्यांनी बोलूच नये असा टोला बाळासाहेब थोरातांनी फडणवीसांना लगावला आहे.

यापुढे असे विधान खपवून घेणार नाही; बाळासाहेब थोरातांचा इशारा

बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत सांगितले आहे की, 'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव सारख्या गुंडाची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणा-या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये, असे फडणवीस यांनी सांगितले. 

निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस अंडरवर्ल्डची मदत घ्यायचे का?: फडणवीस

तसंच, 'देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी, असे देखील थोरातांनी सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, अशी देखील टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

संजय राऊतांकडून इंदिरा गांधी-करीम लाला भेटीचे वक्तव्य मागे