छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वादग्रस्त पुस्तकावरुन जोरदार टीका होत आहे. शिवरायांच्या अपमान करणाऱ्या या पुस्तकावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात मंगळवारी काँग्रेस राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. शिवस्मारकात घोटाळा करणाऱ्या भाजपला खरेतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही घेण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका थोरातांनी केली आहे.
JNU तील त्या दिवशीचा सर्व डेटा जपून ठेवा, हायकोर्टाचे ऍपल, गुगलला आदेश
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडून शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न केला होता, आताही 'आजके शिवाजी :नरेंद्र मोदी' या पुस्तकातून छत्रपतींचा अवमान केला आहे. त्यामुळे भाजपविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे थोरातांनी सांगितले.
हीच ती वेळ!, शिवसेनेच्या हँडलवरील ते टि्वट तेवढं अनपिन करा
दरम्यान, व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या माध्यमातून देशाला वेठीस धरणारे, धार्मिक तेढ निर्माण होईल अशा भूमिका घेणारे, नोटबंदीच्या माध्यमातून सामान्य जनतेला वेठीस धरणारे आणि महत्वाचे म्हणजे हुकूमशाही पद्धतीने कारभार करू इच्छिणाऱ्या नरेंद्र मोदींची कोणत्याच अर्थाने छत्रपती शिवरायांसोबत तुलना होऊ शकत नाही, असे बाळासाहेब थोरातांनी सांगितले. तसंच, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले. मात्र नरेंद्र मोदी जाती धर्मात तेढ आणि विद्वेषाचे काम करत आहे. त्यामुळे महाराजांच्या नखाचीही सर मोदींना येणार नाही, अशी टीका बाळासाहेब थोरातांनी केली आहे.