पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उपमुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब थोरातांचे नाव आघाडीवर?

बाळासाहेब थोरात

राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा पेच लवकरच सुटण्याची शक्यता असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. यासाठी दिल्लीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. तसंच मुंबईत देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. अशामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद आणि काँग्रेसला ५ वर्ष उपमुख्यमंत्री पद देण्यावरुन चर्चा सुरु आहेत. काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये बाळासाहेब थोरातांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरु आहे.

असा असेल सत्तास्थापनेसाठीचा गुलदस्त्यातील फॉर्म्युला!

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले आहेत. या निवडणुकीसाठी बाळासाहेब थोरात यांनी खूप मेहनत घेतली. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढवली. एकट्या बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यामुळेच काँग्रेसला ४४ आमदार निवडून आणण्यात यश आले असल्याने बाळासाहेबांच्या नावाची चर्चा उपमुख्यमंत्री पदासाठी केली जात आहे. 

शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेला काँग्रेस कार्यकारिणीकडून हिरवा

काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी यापूर्वी राज्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळेच या दोन दिग्गज नेत्यांशिवाय उपमुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेब थोरातांच्या नावाला पसंती देण्यात आली असावी. माजी मुख्यमंत्र्यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात येईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.  

'शिवसेनेच्या नादाला लागून महाराष्ट्रातील काँग्रेसही संपेल'