पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

....तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल; अशोक चव्हाणांचा इशारा

अशोक चव्हण

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुद्धा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं वक्तव्य राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

इंदिरा गांधींकडूनही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाण यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्‍या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल.'

...म्हणून दिल्लीची मातोश्री शक्तीशाली झाली: सुधीर मुनगंटीवार