पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसच्या निवेदनात शिवसेनेचा उल्लेखही नाही

काँग्रेसच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर नेते. (फोटो - विपिन कुमार)

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर काँग्रेस कार्यकारिणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये सोमवारी चर्चा झाली. पण या संदर्भात आणखी चर्चा होण्याची गरज आहे. लवकरच ती चर्चा होईल, एवढेच मोघम निवेदन काँग्रेसकडून सोमवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का, कोणत्या मुद्द्यांवर द्यायचा, त्यासाठी किमान समान कार्यक्रम काय ठेवायचा, सत्तेत सहभागी व्हायचे की बाहेरून पाठिंबा द्यायचा हे जोपर्यंत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून निश्चित होत नाही, तोपर्यंत राज्यात शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. 

शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र काम करणार

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा बहुमताचा आकडा दाखविण्यासाठी राज्यपालांकडे मुदत वाढवून मागण्यात आली. पण राज्यपालांनी तशी मुदत वाढवून देण्यास नकार दिला. पण शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी केलेला दावा कायम ठेवला आहे. आता शिवसेनेला आपल्याकडे बहुमत आहे. म्हणजे १४५ आमदारांचा पाठिंबा आहे हे दाखवून मग परत सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची भेट घ्यावी लागणार आहे.

शिवसेनेने वेळ वाढवून मागितला होता - आदित्य ठाकरे

शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का, या संदर्भात सोमवारी नवी दिल्लीत दिवसभर वेगवान घडामोडी घडल्या. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक दोन टप्प्यात पार पडली. दुपारी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नेत्यांना सोनिया गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावले होते. जवळपास तीन ते साडेतीन तास ही बैठक झाली. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या आमदारांशीही फोनवरून चर्चा केल्याची माहिती काही माध्यमांनी दिली. पण या बैठकीनंतर काँग्रेसकडून फक्त वरील निवेदन प्रसारित करण्यात आले. या निवेदनात शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. आता काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी कधी चर्चा करणार आणि आपला अंतिम निर्णय कधी जाहीर करतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.