पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंदिरा गांधी-करीम लाला भेटीचे वक्तव्य मागे घ्या; काँग्रेसची मागणी

संजय राऊत, संजय निरुपम आणि मिलिंद देवरा

शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी दावा केला होता की, 'माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या कुख्यात गुंड करीम लाला याला  भेटण्यासाठी मुंबईमध्ये यायच्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. इंदिरा-गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीविषयी संयज राऊत यांनी केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांनी केली आहे.

 

'रयतेच्या राज्यासाठी शिवाजी महाराजांच्या घराण्यात जन्माची गरज नाही'

संजय राऊत यांच्या या वक्तव्यासंदर्भात काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘इंदिरा गांधी या खऱ्या देशभक्त होत्या. त्यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी कधीच तडजोड केली नाही. मुंबई काँग्रेसचा माजी अध्यक्ष या नात्याने मी संजय राऊत यांच्याकडे चुकीची माहिती देणारं वक्तव्य मागे घेण्याची मागणी करतो’ असं मिलिंद देवरा यांनी सांगितले आहे. तसंच, ‘राजकीय नेत्यांनी दिवंगत पंतप्रधानांविषयी बोलण्यापूर्वी संयम ठेवला पाहिजे’ असं देखील देवरा यांनी सांगितले आहे.

विमानात अल्पवयीन अभिनेत्रीचा विनयभंग, उद्योगपतीला मिळाली

तर, काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी देखील ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी संजय राऊत यांना शेरोशायरीच करण्याचा सल्ला दिला आहे. संजय निरुपम यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘शिवसेनेच्या मिस्टर शायरांनी इतरांच्या हलक्या-फुलक्या शायरी ऐकवत महाराष्ट्राचं मनोरंजन करणंच चांगलं राहील, असा टोमला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तसंच, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी अपप्रचार केलात, तर पश्चातापाची वेळ येईल. काल संजय राऊतांनी इंदिरा गांधींविषयी जे वक्तव्य केलं, ते मागे घ्यावं’ अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. 

मुंबई- भुवनेश्वर LTT एक्स्प्रेसचे ८ डब्बे रुळावरुन घसरले