पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या;काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

काँग्रेस बैठक

परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांना झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष या पिकांसह फळबागाचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतक-यांना मदत द्यावी. या मागणीसाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

...पण ठरल्याप्रमाणे होऊ द्या! सेना यू टर्न घेण्याचे संकेत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली तसंच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत बुधवारी टिळक भवन येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक निकालांसह परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतक-यांच्या नुकसानीबद्दल चर्चा करण्यात आली. 

अकोल्यात अंगावर वीज पडून चौघांचा मृत्यू

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणातील भात शेती उद्धवस्त झाली आहे. फळबागांसह पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागच्या वर्षी दुष्काळात होरपळेल्या शेतकऱ्याला पुन्हा या पावासामुळे ओल्या दुष्काळाचा सामाना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ या शेतीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. 

राष्ट्रवादी विधीमंडळाच्या नेतेपदी अजित पवारांची निवड