पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विरोधकांची सलग दुसऱ्या दिवशी सरकारविरोधात घोषणाबाजी

निदर्शने करताना विरोधक

विधीमंडळ अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून निदर्शने केली. राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर आमदार यावेळी निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.

Maharashtra Budget 2019 : अर्थसंकल्प आज, लोकप्रिय घोषणांची शक्यता

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात आलेली नाही, या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. राज्य सरकारची धोरणे चुकीची असल्याचे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सोमवारी विधीमंडळात सादर करण्यात आला. या अहवालातील आकडेवारी बोगस असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी 'एबीपी माझा' वाहिनीशी बोलताना सांगितले. 

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी मुंबईत सुरुवात झाली. मंगळवारी दुपारी राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करण्यात येणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Cong NCP leaders hold protest at Maharashtra Assembly over the issue of farm loan waiver and state government policies