पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवी मुंबईतील पालिकेच्या शाळेत १४ विद्यार्थिनींचा संगणक प्रशिक्षकाकडून विनयभंग

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी मुंबईतील पालिकेच्या शाळेत संगणक प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या  ३१ वर्षीय लोचन परुळेकर यानं १४ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी लोचन परुळेकरला अटक करण्यात आली असून त्याला २ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. 

नवी मुंबईत दोन वेगवेगळ्या घटनांत तरुणीवर तिघांचा बलात्कार

आरोपी परुळेकरला  एका विश्वस्त संस्थेच्या वतीनं पालिका शाळेत प्रशिक्षक म्हणून  नेमण्यात आलं होतं. तो सहावी ते आठवी 
इयत्तेतील मुलींना प्रशिक्षण द्यायचा मात्र  शिकवणीच्या बहाण्यानं आरोपीने शाळेतील अनेक विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केले. संगणकाचे शिक्षण देण्याच्या बहाण्याने आरोपी सहावी ते आठवीतील विद्यार्थिनींना शाळा सुटल्यावर अथवा सुट्टीच्या दिवशी शाळेत बोलवून त्यांच्याशी गैरवर्तन करत असे. 

 

कोणते गुन्हे मागे घेतले?, प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला सवाल

घाबरलेल्या विद्यार्थिनींनी प्रारंभी हा प्रकार कुणाला सांगितला नाही. मात्र मुलींमध्ये याबाबत कुजबुज सुरू झाल्यानंतर शाळेतील एका मुलीनं शिक्षिकेच्या कानावर हा प्रकार घातला. पुढे शिक्षकांनी हा प्रकार मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिला अशी माहिती, पोलिसांनी दिली. 
शिक्षण विभागाचे उपायुक्त, शिक्षणाधिकारी नितीन काळे यांनी विश्वस्त संस्थेला तातडीने नोटीस बजावून संबंधित संगणक शिक्षकाला तात्काळ कामावरून काढून टाकण्याचे व त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. परुळेकरविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी त्याच्यावर विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

'महिला नेतृत्वाच्या जागेसाठी अमृता फडणवीस यांची धडपड सुरु आहे का?'