पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गॅसच्या वासाने मुंबईकर घाबरले; अग्निशमन दलाकडे अनेक तक्रारी

अग्निशमन दल

मुंबईच्या विविध भागांमध्ये गॅसचा वास येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मुंबई पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील वेगवेगळ्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना गुरुवारी रात्रीपासून अचानक गॅसचा वास येऊ लागला. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी ताबडतोब अग्निशमन दल आणि महानगर गॅस कंपनीला संपर्क केला. मानखुर्द, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, पवई, विक्रोळी, हिरानंदानी, चकाला, गोरेगाव, विलेपार्ले, कांदिवली या भागामध्ये गॅसचा वास येत आहे. रात्रत्रर अग्निशमन दल आणि महानगर गॅस कंपनीकडे तक्रारीचे फोन येत होते.

 

दरम्यान, तक्रारी आलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या. मात्र नेमकी गॅस गळती कुठे होत आहे हे अद्याप समजले नाही. गॅसच्या वासामुळे घाबरलेल्या मुंबईकरांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केल्या. मुंबई महापालिकेने याची दखल घेत. मुंबईतील केमिकल कंपन्यांना सतर्कतेचा इशारा दिला. नेमकी गॅस गळती कुठे झाली आहे याचा तपास लावला जात असल्याचे देखील पालिकेने सांगितले आहे. 

विक्रम लँडर नासाच्या ऑर्बिटर कक्षेत आल्याचे स्पष्ट

चेंबर येथील राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या प्लांटमध्ये गॅस गळती झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र त्याठिकाणी गॅस गळती झाली नसल्याचे पालिकेने रात्री उशिरा ट्विट करुन स्पष्ट केले. दरम्यान, महानगर गॅस कंपनीला देखील नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्या. ज्या भागातून तक्रारीचे फोन आले त्या भागांमध्ये आमच्या टीम सक्रीय झाल्या आहेत. मात्र पाईपलाईनमधून नेमकी कुठे गॅस गळती होत आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही, अशी माहिती ट्विटद्वारे महानगर गॅस कंपनीने दिली. 

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये दिवाळी बोनस