पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'शिवसेनेचा मुख्यमंत्री ५ नव्हे २५ वर्षे सत्तेत राहिल, पण मी पुन्हा येईन म्हणणार नाही'

संजय राऊत

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुढील पाच नाही तर २५ वर्षे राज्यात सत्तेवर राहिल. पण आम्ही कधीही मी पुन्हा येईन, असे म्हणणार नाही, या शब्दांत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. शिवसेनेला कायम महाराष्ट्रातच राहायचे आहे. त्यामुळे आम्ही कायम सत्तेतच राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नव्या आघाडीत मुख्यमंत्री शिवसेनेचाच यावर शिक्कामोर्तब, पण...

नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, तिन्ही पक्ष मिळून जो काही किमान समान कार्यक्रम ठरवतील तो महाराष्ट्राच्या हिताचाच असणार आहे. आमच्यासोबत जे आहेत त्यांचा राज्य चालविण्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्याचा सगळ्यांना फायदाच होईल. सगळ्यांना सोबत घेऊन काम केल्यामुळे कोणाला अडचण येण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षासाठी शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे पहिले सरकार किमान समान कार्यक्रमावरच चालले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यावेळी भाजपचेही नेते होते, अशीही आठवण संजय राऊत यांनी यावेळी सांगितली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Common Minimum Programme will be in interest of Maharashtra says shivsena leader Sanjay Raut