पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्य आणि पश्चिम रेल्वे लाईफ जॅकेट्स, बोटी खरेदी करणार; कशासाठी माहितीये?

लाईफ जॅकेट्स

मध्य आणि पश्चिम रेल्वेने लाईफ जॅकेट्स आणि बोटी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्याच्या काळात पाणी साचल्यामुळे मुंबईत लोकल बंद पडल्यावर बचाव पथकाला घटनास्थळी घेऊन जाण्यासाठी आणि बचावकार्य सुरू करण्यासाठी हे लाईफ जॅकेट्स आणि बोटी उपयोगी पडणार आहेत. काही दिवसांपूर्वीच वांगणीजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस पुराच्या पाण्यात अडकली होती. त्यावेळी बचावकार्य करताना आलेल्या अडचणींचा विचार करून मध्य आणि पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट, पण कोल्हापुरात पूरस्थिती अद्याप कायम

रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे एक लाख ७० हजार रुपये खर्चून १० बोटी विकत घेणार आहे. पश्चिम रेल्वेने एक बोट खरेदी केली असून, अजून सात विकत घेण्यात येणार आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील विभागीय कार्यालयांकडून ८० लाईफ जॅकेट्सही विकत घेण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत या वस्तू पथकांकडे उपलब्ध असतील.

काश्मीरमधून आता दहशतवाद, घराणेशाहीचा नायनाटः PM मोदी

रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे कर्मचारी यांच्या विशेष पथकांकडून या वस्तू गरजेप्रमाणे वापरल्या जातील. या पथकातील कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे, पोहण्याचे, बचाव कार्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आपातकालीन स्थितीत रेल्वेकडूनच पहिल्यांदा बचावकार्यासाठी प्रयत्न सुरू केले जातात. आता बोटी आणि लाईफ जॅकेट्स आल्यामुळे बचावकार्य आणखी वेगाने करणे शक्य होईल.