पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकऱ्याचा पुत्र अध्यक्ष झाला याचा आनंद: मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे

विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्ष पदाच्या निवडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्याचा पुत्र अध्यक्ष झाला याचा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध

'एक बंडखोर स्वभावाचा, अन्याय सहन न करणारा आणि आपलं मत मांडायला कोणाचीही परवा न करता धाडस दाखवणारा महाराष्ट्राचा पुत्र या अध्यक्षपदी विराजमान झाला असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी नाना पटोले यांचे कौतुक केले. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातून तुम्ही आला आहात. संघर्ष करुन तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात, असे देखील त्यांनी सांगितले. 

अमेरिकेत विमान अपघात; ९ जणांचा मृत्यू

'आता आपली जबाबदारी वाढली आहे. आम्हाला सांभाळून घेणे आपले काम आहे. तसंच अध्यक्षमहोद्य आपण अन्याय होऊ देणार नाही. तसंच वेळ प्रसंगी चुकलो तर आमचे कान देखील पकडा, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. समाजातील प्रत्येक स्थराला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहात आणि राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. 

१ डिसेंबरपासून हे ५ नियम बदलले; ज्याचा थेट परिणाम खिशावर