पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर

शिवसेना वचनपूर्ती सोहळ्यात आदित्य ठाकेर, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करून सत्तेत आलेले आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज, शनिवारी अयोध्येला जाणार आहेत. रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी या विशेष दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ते अयोध्येमध्ये येतील, अशी माहिती शुक्रवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली. सकाळी नऊच्या सुमारात ते मुंबई विमानतळावर सहकुटूंब दाखल झाले आहेत.

कोरोनाच्या जलद निदानासाठी NIV कडून स्पेशल मेडिकल किट्सची मागणी

उद्धव ठाकरे सहकुटूंब अयोध्येला जाणार आहेत. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सामना वृत्तपत्राच्या संपादक रश्मी ठाकरे त्यांच्यासोबत उपस्थित असणार आहेत. दर्शन झाल्यावर उद्धव ठाकरे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर लगेचच ते परत मुंबईकडे येणार आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विनंतीवरून अयोध्या दौऱ्यात नियोजित शरयू नदीवरील महाआरती रद्द करण्यात आली आहे. महाआरतीसाठी भाविकांची आणि शिवसैनिकांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे आरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात : PM मोदी

महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन १०० दिवस पूर्ण झाले. शुक्रवारीच सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्तेत असलो तरी हिंदुत्त्वाचा मुद्दा आम्ही सोडलेला नाही, हे दाखवून देण्यासाठीच उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तिसऱ्यांदा उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.