पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली 'मेट्रो-३'च्या कामाची पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'मेट्रो-३'च्या कामाची पाहणी

मुंबईत मेट्रोची कामे मोठ्या वेगाने सुरु आहेत. येत्या काळात मेट्रोमुळे मुंबईकरांना थोडाफार दिलासा मिळेल. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबई मेट्रो मार्गिका-३ (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) कॉरिडॉरमधील कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सहार मेट्रो स्थानकाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. 

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मेट्रोचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. मुंबई मेट्रो-३ मधील पॅकेज-६ च्या कामाची एकूण प्रगती ५९% झालेली आहे तसेच बोगद्याची प्रगती ७३% झालेली आहे. त्याचबरोबर सहार मेट्रो स्टेशनची प्रगती ४८% झालेली आहे.

...जीतकर हारनेवाले को केजरीवाल कहते हैं, थरुर यांचा टोला

मेट्रो मार्गिकेच्या ट्रॅकचे आंतर बदल (inter change) व्हावे यासाठी सहार रोड ते सीएसएमआय ए आंतरराष्ट्रीय विमानतळ स्टेशनदरम्यान भूमिगत सीझर क्रॉस ओव्हर बांधण्यात येणार येत आहे. २६६ मीटर लांब व १६ मीटर रुंद असलेल्या सीझर क्रॉस ओव्हरचे बांधकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीद्वारे करण्यात येत आहे.

सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल, संचालक (प्रकल्प) एस. के. गुप्ता व आर. रामना सोबत होते.