महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भारतरत्न गाण कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची भेट घेत तब्येतीची चौकशी केली. ११ नोव्हेंबरपासून लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मध्यरात्री २ वाजता त्यांना श्वसनाचा त्रास उद्धभवल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांसह लता दीदीजींच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.
Mumbai: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray visited Lata Mangeshkar at Breach Candy Hospital, today. Lata Mangeshkar was admitted to the hospital on 11th November, after she complained of problem in breathing. (file pics) pic.twitter.com/3kr2QvjS6L
— ANI (@ANI) November 29, 2019
CM उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडच्या कामाला दिली स्थगिती
महाआघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी मुंबईकरांच्या आणि पर्यावरणवाद्यांचा जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या आरे प्रकरणातील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आरेतील कारशेडचे काम स्थगित करण्यात आले आहे. मंत्रालयातील कामकाजानंतर विधीमंडळ वार्ताहर संघाकडून आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली.