पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्हाला हिंदुत्व सिद्ध करायची गरज नाही: उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

'आम्ही मरेपर्यंत हिंदुत्व सोडणार नाही. आमचे हिंदुत्व काय आहे हे जगाला माहिती आहे. आम्हाला हिंदुत्व सिद्ध करायची गरज नाही. मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही, असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. मनसेने पक्षाचा झेंडा बदलत हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल केली. तसंच रविवारी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोऱ्यांविरोधात मुंबईत मोर्चा काढत मनसेने शक्तीप्रदर्शन केले. यावरच प्रतिक्रिया देतानाच मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य केले.

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

शिवसेना आणि मनसे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आमने-सामने आले आहेत. हिंदुत्वावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, 'मी माझ्या झेंड्याचा रंग बदला नाही. आमचे हिंदुत्व काय आहे हे जगाला माहिती आहे. आम्हाला हिंदुत्व सिद्ध करायची गरज नाही. आमचे हिंदुत्व बाळासाहेबांचे आहे आणि ते शुध्द आहे. एक माणूस एक झेंडा हे आधीच ठरले आहे.' तसंच, आम्ही कधीही झेंड्याचा रंग बदलला नाही, कालही आमच्या हाती भगवा होता, आजही आहे आणि भविष्यातही राहील, असा टोला त्यांनी मनसेला लगावला आहे.    

न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही:

दरम्यान, मनसेच्या महामोर्चात राज ठाकरे यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात एल्गार पुकारला. यावेळी त्यांनी सीएए-एनआरसी विरोधात मोर्चा काढणाऱ्यांना इशारा दिला. तसेच हिंदूवरही भाष्य केले. आपण केवळ दंगल झाली की हिंदू असतो. एरवी तसे आम्हाला जाणवत नसते, असा टोला त्यांनी लगावला. तसंच, आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले आहे. यापुढे नाटक कराल तर दगडाला दगडाने तर तलवारीला तलवारीने उत्तर देऊ, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. त्याचसोबत हिंदूंनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी ठेकेदाराची केली हत्या