पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाग्रस्तांचा वाढलेला आकडा शून्यावर आणायचाय : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत आहेत. हा काळ गुणाकाराचा आहे. चिंतेचे कारण आहे पण घाबरु जाऊ नका. मात्र आता कोरोनाग्रस्तांचा वाढलेला आकडा आपल्याला शून्यावर आणायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी घरी बसणं हाच कोरोनावर मात करण्याचा एकमेव उपाय आहे. सर्वांच्या सहकार्यातून आपण लवकरच या परिस्थितून बाहेर पडू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.  

कोरोनाच्या परिस्थितीबद्दल पंतप्रधानांनी साधला प्रमुख गटनेत्यांशी संवाद

कोरोना आपल्या मागे लागला आहे. पण आपण सुद्धा सर्वजण कोरोनाच्या मागे हात धुवून लागलो आहोत. पहिला रुग्ण आढळून काल चार आठवडे पूर्ण झाले. कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ झाली. मला या वाढीचा ग्राफ खाली आणायचा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगतिले. हा महत्त्वाचा काळ आहे. घरी रहा सुरक्षित रहा, तंदुरुस्त राहा, योगासनं करा, व्यायाम करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे. 

कोरोनाचं केंद्रबिंदू असलेल्या वुहानमध्ये ७६ दिवसांनी हटवलं लॉकडाऊन

कोरोनाविरोधातील युद्ध आपण जिंकणार आहोत. मात्र या युद्धानंतर सर्वात मोठं आर्थिक युद्ध येणार आहे. हे युद्ध लढण्यासाठी सर्वांना तयारी करावी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वुहानमधील सर्व निर्बंध उठवले आहे. ही दिलासादायक बातमी आहे. आपण सुद्धा दक्षतेने सामना केला तर ही परिस्थिती जाईल. कोरोनाविरोधातील लढाई तंदुरुस्तीने लढायची आहे. व्यायाम केला तर मानसिक युद्ध लढायला बळ मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ९ वर; दोन नव्या रुग्णात वाढ

दरम्यान, केंद्रानं दिलेल्या योजनेत फक्त तांदूळ आणि तेही लाभार्थ्यांसाठी आहे. राज्य सरकार केशरी शिधापत्रकधारकांना सवलतीच्या दरात धान्य देत आहे. तीन वेळच्या खाण्याची सोय सरकारने केली आहे. माणुसकीच्या नात्याने गरजूंना अन्नछत्राची व्यवस्था केली आहे. साडेपाच-सहा लाख लोकांना जेवण दिले जात आहे, असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १०१८ वर, १५० नव्या रुग्णात भर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cm uddhav thackeray says the increased number of corona patient has to be brought to zero