पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नववर्षात पोलिसांना तणावमुक्त करण्याची जबाबदारी शासन घेईल'

उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन संचलन कार्यक्रम पार पडला. या समारंभावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांशी संवाद साधला. 'पोलिस नेहमीच तणावात असतात, त्यामुळे नववर्षात त्यांना तणावमुक्त करण्याची जबाबदारी शासन घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पोलिसांना चांगली घरं आणि चांगली शस्त्र देऊ, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

'१४ एप्रिल २०२२ पर्यंत आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण करु'

रक्षणकर्त्याचे मनोबल वाढवणे आणि त्यांना सर्व सेवासुविधा देण्यासाठी प्रयत्न करु, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पोलिस वर्धापन दिन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या वतीने मुंबई पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मरोळ येथे बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 

प्रत्येक पक्षात अंतर्गत कुरबुरी असू शकतात: संजय राऊत

पोलिस कर्मचाऱ्यांकरिता मरोळ येथे ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. प्रत्येकी ४८४ स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेल्या सदनिकांचे निर्माण केले जाणार आहे. सात मजल्यांच्या १६ इमारतींचा यात समावेश असणार आहे. या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रीडासंकुल आणि सर्व सुविधायुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. 

कोणत्या मंत्र्याला मिळाला कोणता बंगला?, वाचा पूर्ण यादी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cm uddhav thackeray says government will take responsibility for relieving the police in the new year