पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळा: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'महाराष्ट्रात कोरोनाचा धोका नाही. मात्र भयभीत न होता या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळा.', असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कोरोना विषाणूसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत निवेदन दिले यावेळी ते बोलत होते. कोरोनाचे निदान करण्यासाठी मुंबई, पुणे नागपूर येथे प्रयोगशाळा उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

फ्लिपकार्टचे सचिन बन्सल यांच्याविरोधात पत्नीची तक्रार

राज्यातील खासगी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड उभारण्यास सांगण्यात आले आहे. मास्कच्या पुरवठ्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सर्व विमानतळांवर योग्य तपासणीच्या यंत्रणेला सूचना देण्यात आल्या असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच, महाराष्ट्रात सध्या भितीचे वातावरण नाही. त्यामुळे घाबरु नका आपले शासन सक्षम आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

'कोरोना केवळ शहरांमध्ये, ग्रामीण भाग सुरक्षित'

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर जनतेला आवाहन केले आहे. पुढेचे ८ ते १० दिवस काळजीपूर्वक वागणे गरजेचे आहे. भयभीत झाल्यामुळे जे करायला नको त्या चुका आपण करतो. त्यामुळे काळजी घ्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळवड खेळणे टाळा. अनावश्यक प्रवास करणे आणि गर्दीत जाणे टाळा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

होळीनिमित्त सुटीच्या काळात सुप्रीम कोर्टात पहिल्यांदाच व्हेकेशन बेंच

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cm uddhav thackeray says avoid unnecessary travel and rush in the backdrop of corona virus