पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठीचं वाकडं करण्याची हिंमत कुणातही नाही: मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे (Photo by Satish Bate)

'आपल्या मातृभाषेचा अभिमान, स्वाभिमान असायला पाहिजे. मराठी भाषा टिकवण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे. नवं स्विकारताना जुन्या मराठीसोबतच आपण पुढे जाऊया असे.', आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मराठी भाषा दिनानिमित्त विधानभवनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी दोन्ही एकाच मंचावर उपस्थित होते.

दिल्ली हिंसाचार : पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याचे संकेत

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की,  'बाकीच्या भाषा जुन्या असतील पण त्याचा आदर मी करतो. मराठी भाषा टिकली पाहिजे. मराठीचं वाकडं करण्याची हिंमत कुणातही नाही. मराठी भाषा गौरव दिन एकच दिवस का साजरा करायचा? तोही चिंतेत भावनेनं का साजरा करायचा?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. तसंच, आज मातृभाषेच्या नव्हे तर आईच्या सन्मानाचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. 

दिल्ली दंगलीची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची बदली, काँग्रेसची टीका

'भाषा संस्कारांतून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. मराठी भाषा शक्तीची आणि भक्तीची भाषा आहे, असे सांगत राज्यातील शाळांची नावं मराठीमध्ये का नाहीत? असा सवाल मुख्यमंत्र्यानी केला आहे. संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई अशी नावं शाळांना असायला हवीत असे त्यांनी सांगितले. शाळांमध्ये मराठी भाषा ही सक्तीची करावी लागते, असे देखील त्यांनी सांगितले.  

दिल्ली हिंसाचार: वादात सापडलेले ताहिर हुसेन आहेत तरी कोण?

'जिथे-जिथे संकट आले तिथे माझी मराठी धावली. इंग्रजांना ठणकावून सांगणारी टिळकांची भाषा सुद्धा मराठीच होती. इंग्रजांना डोके ठिकाणावर आहे का? असं  विचारणारी मराठीच होती, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच, 'शाळेत गेल्याने भाषा येते असे नाही. भाषा संस्कारातून येते. तसंच, मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेचा कायदा करण्याचे भाग्य मला मिळाले', असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

कोरोना : जपानच्या जहाजात अडकलेले ११९ भारतीय २० दिवसांनी मायदेशी

'जुन्या गोष्टी सोडून नवं आत्मसात करायचे असे नाही. पण जुन्याचे वैभव वाढवण्यासाठी नवं स्विकारायाचे, असे मुख्यममंत्र्यांनी यावेळी सांगितले. 'माझी भाषा, माझी संस्कृती जपण्याचे काम त्याकाळी संतांनी केले आता आपण केले पाहिजे. मराठी भाषा जपण्याचे काम केले तर आपले आयुष्य सार्थ झाल्यासारखे वाटेल. बोलण्या, ऐकण्याप्रमाणे मराठी पाहता सुध्दा आली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

दिल्ली हिंसाचार : हे गृहमंत्रालयाचे अपयश; रजनीकांत यांची टीका