पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालघरमधील घटना गैरसमजुतीतून, धार्मिक रंग देऊ नकाः ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पालघर जिल्ह्यातील घटना गैरसमजुतीतून घडली असून तो दोन धर्मातील संघर्ष नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. हा प्रकार निंदनीय असल्याचेही त्यांनी म्हटले. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. सोशल मीडियावर चुकीची माहिती दिली जात असून याला धार्मिक रंग चढवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी राज्य सरकारने हल्ला करणाऱ्यांविरोधात कडक पाऊल उचलले असून ११० जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर यातील प्रमुख ५ आरोपीही सध्या कारागृहात कैद असल्याची माहिती त्यांनी दिली. 

कोरोना: नो मास्क, नो पेट्रोल-डिझेल, देशभरात लागू

सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधल्याची माहिती दिली. 

ते पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत मॉब लिचिंगसारख्या घटना घडल्या नाहीत का? त्याची कारणे वेगवेगळी आहेत. आपल्याला यावर राजकारण करायचे नाही. परंतु, पालघर जिल्ह्यात हा प्रकार झाल्यानंतर सरकार काय करत आहे, असा सवाल करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार गैरसमजुतीतून झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तिथे चोर फिरतायत अशी अफवा आहे. त्यातून हा प्रकार घडला. हे निंदनीय आहे. पण पोलिस गप्प बसलेले नाहीत. 

पालघरमध्ये चोर समजून तिघांची हत्या केल्यावरून ११० जणांना अटक

दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ हा प्रकार घडला. दोन साधू गुजरातला या दुर्गम भागातून जात होते. गैरसमजुतीने त्यांची हत्या झाली . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझा संवाद साधला. त्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल सरकारकडे मागितला आहे. घटनेनंतर पोलिस अधीक्षकांनी मध्यरात्री १२.३० वाजता जाऊन कारवाई केली. पहाटे ५ वाजेपर्यंत जंगलातून १०० जणांना पकडले. पाच मुख्य आरोपी गजाआड आहेत. तर गैरसमजातून हत्या असूनही कोणालाही माफ करणार नाही. याप्रकरणी दोन दोन पोलिसांचंही निलंबन करण्यात आले आहे. 

बंगळुरूतील कंपनीने तयार केले स्वस्तातले व्हेंटिलेटर्स, विजेची गरज नाही

दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेवर गेल्यानंतर त्यांना तिथे रोखण्यात आले. त्यांना परत पाठवले. जर त्यांना तिथे ठेवून घेऊन सकाळी परत पाठवले असते तर हा प्रकार घडलाच नसता. पण आता जर-तरला अर्थ नाही. याप्रकरणी मी अमित शहांशी बोललो. सोशल मीडियावर आग लावणारे जे लोक आहेत, त्यांचा तुम्ही शोध घ्या आम्ही ही घेतो, असे अमित शहांना म्हटले आहे. या प्रकरणामध्ये कोणाचा तरी तेल ओतण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले. 

गोवापाठोपाठ मणिपूर कोरोना मुक्त, राज्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

दरम्यान, त्यांनी हे संकट टळलेलं नाही, लॉकडाऊन संपलेला नाही असे स्पष्ट केले. रुतलेलं अर्थचक्र पुन्हा हळू सुरु करत आहोत. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये शिथिलता दिली आहे. गेल्या ३६ तासांत राज्यात ८३५ नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याचे सांगताना लॉकडाऊन लवकर कसं संपेल हे आपल्याच हातात आहे, संकट टळलंय या भ्रमात कुणीही राहू नका, असा इशाराही दिला.