पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्री कोल्हापूरकडे रवाना; पूरग्रस्त भागांची करणार पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Kunal Patil/HT Photo)

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नद्यांना आलेल्या पूराने रुद्रावतार धारण केला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर झाली असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. हजारो लोकं पूरामध्ये अडकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही जिल्ह्यातल्या पूरपरिस्थितीचा आढवा घेण्यासाठी कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.  

सांगलीत महापूराचा रुद्रावतार; प्रशासनाची यंत्रणा कोलमडली

मुंख्यमंत्री आज कोल्हापूर आणि सांगलीचा दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी ते मुंबईहून कोल्हापूरकडे हवाईमार्गे रवाना झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांची ते पाहणी करणार आहेत. आज हवामान अनुकुल असल्यास ते सांगली जिल्ह्याचा देखील दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे सुध्दा पूरग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते बैठक घेणार आहेत. 

कोल्हापूरमधील पूरस्थिती अद्याप गंभीर, नागरिकांचे हाल

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत्या 24 तासामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा, कोयना आणि वारणा नदीला महापूर आला आहे. ही परिस्थिती पाहता कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यामधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

येत्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार; हवामान खात्याचा इशारा