पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्याला खिचडी सरकारची नाही तर स्थिर सरकारची गरज: फडणवीस

देवेंद्र फडणवीस

राज्यामध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे सरकार स्थापन झाले आहे. 'महाराष्ट्रासमोर जी आव्हानं आहेत त्याचा सामना समर्थपणे करू. पाच वर्षे पूर्ण ताकदीनं सरकार चालवू', असे आश्वासन नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राज्यामध्ये सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानले आहे.

राज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या बळावर सत्ता स्थापनेचा दावा केला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसंच, नवं राजकारण न पटल्यानं अजित पवार यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आणि आम्ही सत्तास्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसंच, राज्यातील संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहू असे देखील ते म्हणाले.

'उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारला'

फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेवर टिका केली आहे. एकमेकांना दिलेल्या वचनापेक्षा जनतेला वचन दिले होते की आम्हाला निवडणून द्या. आम्ही एकत्र सरकार स्थापन करुन. मात्र याचा भंग झाला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, लोकांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिला होता. परंतु निकालानंतर शिवसेनेने अन्य पक्षांशी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. परिणामी राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्याला खिचडी सरकारची नव्हे तर स्थिर सरकारची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

झारखंडमध्ये निवडणुकीपूर्वी नक्षलवाद्यांचा हल्ला

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cm devendra fadnavis says maharashtra needed a stable government not a khichdi government