पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आरोपांमध्ये तथ्य नसल्यास राज ठाकरेंना सोडलं जाईल'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. कोहिनूर मिल प्रकरणी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली असून येत्या २२ ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांना ईडीसमोर हजर रहावे लागणार आहे. त्यामुळे मनसे आक्रमक झाली असून २२ ऑगस्ट रोजी मनसेने ठाणे बंदचा इशारा दिला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांना ईडीने नोटीस का पाठवली आहे याबाबत मला काहीच माहिती नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.  

J&K मधील ११ दिवसांच्या मुक्कामानंतर डोवाल यांनी घेतली शहांची भेट

राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यामुळे मनसेने सरकारवर आरोप केला आहे. भाजप सूडबुध्दीने कारवाई करत असल्याचे मनसेने म्हटले आहे. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज ठाकरेंना ईडीने नोटीस कशासाठी पाठवली आहे याबाबत मला काहीच माहिती नाही. त्यांना नोटीस पाठवली असल्याचे मला माध्यमातून समजले. ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यांचे काम स्वतंत्र पध्दतीने चालते. तिचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही. ईडीकडून चौकशा सुरुच असतात. त्यात सूडबुध्दीचा संबंध येत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

राम मंदिरासाठी सोन्याची वीट देईन, पण एका अटीवर - मुघल वंशज 

दरम्यान, चूक नसेल तर राज ठाकरे यांना घाबरण्याची गरज नाही. आरोपांमध्ये तथ्य नसल्यास राज ठाकरेंना सोडलही जाईल असे त्यांनी सांगितले. ईडीला एखादे ट्रान्झॅक्शन दिसले तर ते चौकशीला बोलावतात. त्यात काही गैर सापडले नाही तर सोडून देतात. पण चूक असेल तर ती भोगावीच लागेल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आज राज्यातील पूरस्थितीवर करण्यात आलेल्या उपययोजनांची माहिती देताना भाजपवर आरोप करणाऱ्या मनसेला मुख्यमंत्र्यांनी सडेउत्तर दिले आहे. 

पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी, घर बांधणीसाठी अतिरिक्त १ लाखाची मदत