पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'इमारत १०० वर्षे जुनी असताना धोकादायक इमारत यादीत समावेश नाही'

मुख्यमंत्री

मुंबईतील डोंगरी भागामध्ये असलेली केसरबाई इमारत कोसळून आतापर्यंत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेमध्ये ८ जण जखमी झाले आहेत. त्याच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, ही इमारत १०० वर्षे जुनी असून तिचा समावेश धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हता अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Dongri Building Collapses Live : तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

डोंगरी इमारत दुर्घटना प्रकरणाची सर्व माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळावर तातडीची मदत आणि बचावकार्य करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या घटनेप्रकरणी प्रतिक्रिया देत असताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ही इमारत १०० वर्षे जुनी आहे. तसंच ही इमारत धोकादायक असताना देखील तिचा समावेश धोकादायक इमारतीच्या यादीमध्ये नव्हता. त्याचसोबत या इमारतीचे पुनर्विकासाचे काम विकासकाला देण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली. तसंच, या दुर्घटना प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

डोंगरी दुर्घटना : मानवी साखळीद्वारे मदतकार्य सुरू

मुंबईतल्या अतिशय दाटीवाटी असलेल्या डोंगरी परिसरामध्ये आज सकाळी ११ वाजून ४० मिनिटाने इमारत कोसळल्याची घटन घजली. केसरबाई ही ४ मजली इमारत कोसळली. या इमारतीमध्ये १५ कुटुंब राहत होती. इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफ टीम आणि पोलिसांकडून बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. 

डोंगरी दुर्घटना : अरुंद रस्त्यांमुळे बचाव कार्यास मोठा अडथळा