पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पूरग्रस्तांना तातडीची मदत करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर परिस्थिचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. सध्या राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळून या जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे आलेल्या पूराचा सर्वात जास्त फटका बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना तातडीने मदत करा, त्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी आणि जेवण पूरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच राज्यातील आरोग्य यंत्रणांनी सतर्क रहावे असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

रेपो दरात सलग चौथ्यांदा कपात, कर्जे स्वस्त होण्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यामध्ये बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. एनडीआरएफच्या 22 टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या आणखी टीम कोल्हापूर आणि सांगलीकडे रवाना करण्यात येणार आहे. तर नौदलाच्या 5 टीम कोल्हापूर आणि सांगलीसाठी रवाना झाल्या आहेत. पूरग्रस्त भागामध्ये 41 बोटी कार्यरत आहेत. 14 बोटी आणखी पाठवण्यात येणार आहेत. तसंच बचावकार्यासाठी नौदल, वायूसेना आणि लष्कराची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.  

कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर; बचावकार्यासाठी नौदल दाखल

कोल्हापूरातील 204 गावांना पूराचा फटका बसला असून 11 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सांगलीतील पुराचा फटका बसलेल्या 53 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेडा, माळशिरस याठिकाणी पूराचा फटका बसलेल्या 4000 कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. साताऱ्यातील 6 हजार कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्याठिकाणची परिस्थीती अटोक्यात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

पर्लकोटा नदीला पूर; भामरागडचा संपर्क तिसऱ्यांदा तुटला

राज्यात ज्या ठिकाणी पूर ओसरला तिथे पिण्याचे शुद्ध पाणी, वीज आणि आरोग्य सुविधा तातडीने देण्यासाठी यंत्रणेने सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. साथ रोगाचा अटकाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने उपाययोजना अधिक वाढवाव्यात. राज्यात पूरग्रस्त भागात आरोग्य सुविधेसाठी सुमारे 162 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. आवश्यकता भासल्यास मुंबई येथून वैद्यकीय पथक देखील पाठविण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तर बचावकार्यात अडथळा नको म्हणून घटनास्थळी जाणे टाळले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसंच पूराचे पाणी ओसरल्यानंतर शेतीचे पंचनामे करुन मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

सुषमा स्वराज यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीतही हळहळ