पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर देशामध्ये सगळीकडे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि शांताता व संयम राखावा, फडणवीस यांनी सांगितले.

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट शनिवारी सकाळी देणार निकाल 

या प्रकरणातील सर्व बाजू आणि सर्व पक्षांना ऐकल्यानंतरच आता हा निकाल  सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या निकालानंतर समाजामध्ये सलोखा राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशाच प्रकारे आपली अभिव्यक्ती असली पाहिजे. या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि संयम राखून कायदा-सुव्यवस्था राखण्यास योगदान द्यावे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. राज्य सरकार सर्व यंत्रणांच्या संपर्कात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोपः उद्धव ठाकरे