पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवी मुंबईत फिल्मी स्टाईल पाठलाग करून महिलेने चोरट्या दाम्पत्याला पकडले!

प्रातिनिधिक छायाचित्र

रस्त्यावर लहान मुलांचे तयार कपडे विकणाऱ्या २९ वर्षांच्या महिलेने मोठ्या धाडसाने चोरी करून पळणाऱ्या एका दाम्पत्याला पकडले आणि त्यांना पोलिसांच्या हवाली केले. सोनाली सुसवीरकर असे या महिलेचे नाव आहे. नवी मुंबईत कामोठे भागात ही महिला रस्त्यावर लहान मुलांचे तयार कपडे विकण्याचा व्यवसाय करते. 

नेपाळी दिसतात म्हणून दोन बहिणींना पासपोर्ट नाकारला

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी ती व्यवसाय करीत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका दाम्पत्याने तिच्या स्टॉल खाली ठेवलेली तयार कपड्यांची बॅग घेतली आणि ती एका रिक्षात नेऊन ठेवली. या ठिकाणीच फळे विक्रीचा स्टॉल लावलेल्या एका व्यावसायिकाने हा सर्व प्रकार बघितला आणि तो सोनाली यांना सांगितला. तोपर्यंत ते दाम्पत्य रिक्षातून पळून जाऊ लागले होते. 

सोनाली यांनी लगेचच पळत पळत रिक्षाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पण त्या पद्धतीने रिक्षाला थांबविणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या एका नातेवाईकाला लगेचच गाडी घेऊन येण्यास सांगितले. नंतर दुचाकीवरून त्यांनी रिक्षाचा पाठलाग केला. साधारण एक किलोमीटर अंतर कापल्यावर त्यांना रिक्षाला थांबविण्यात यश आले. रिक्षा थांबल्यावर त्याचा चालक पळून गेला. मागे बसलेले दाम्पत्यही पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पण सोनाली यांनी त्या दोघांना पकडले. त्यानंतर या दोघांनाही कामोठे पोलिसांच्या हवाली करण्यात आले. 

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; आंबिवलीजवळ डंपरची रेल्वेगेटला धडक

चोरलेली बॅगही त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ३८ लेगिंग्स, तीन स्कर्ट आणि लहान मुलांचे कपडे होते. पोलिस पुढील तपास करीत आहेत.