जनता कर्फ्यूला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर सर्वांनी ५ वाजता टाळ्या, थाळ्या वाजवल्या. मात्र, टाळ्या, थाळ्या आणि घंटानाद केल्याने कोरोना विषाणू दूर होतो असे होत नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. टाळ्या आणि थाळ्या या जे आपले वीर पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस या युध्दात आपल्या जीवाची बाजी लावून लढत आहेत त्यांची प्रशंसा करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोना विषाणू : राहुल गांधींनी पंतप्रधानांना विचारले दोन प्रश्न
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला जनतेने चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. हा निर्णायक टप्पा असून यामध्ये पुढचे काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अनेक वेळेला लोकांना वाटते की आता तेवढे संकट राहिले नाही. आपण एक फेरफटका मारून येऊ या. मात्र ही मौजमजा करण्याचे दिवस आणि वेळ नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
टॅक्सी-रिक्षाला परवानगी मिळेल, पण...
दरम्यान, ज्या लोकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यांनी काळजी घेणे खूप आवश्यक आहे. घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचनांचे पालन करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच, राज्यात जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकानं सुरु राहतील. अन्नधान्य, किराणा, दूध, औषधे, बेकरी, कृषीविषयक दुकाने, पाळीव प्राण्यांशी संबंधित दुकाने सुरु राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.