पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चित्रा वाघ यांनी तो आरोप फेटाळला

चित्रा वाघ

आपल्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीतून सोडविण्यासाठी चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आरोप काही जणांनी केला होता. पण खुद्द चित्रा वाघ यांनी तो स्पष्ट शब्दांत बुधवारी फेटाळला. चौकशीचा आणि माझ्या पक्षप्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचे चित्रा वाघ यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

पक्षप्रवेश होत असले, तरी आमची युती अभेद्य - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत चित्रा वाघ यांनी बुधवारी पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला.

आमच्या पक्षातील जुन्यांची काळजी करू नका, चंद्रकांत पाटील यांचे उत्तर

त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी विरोधी पक्षात होते. त्यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सरकारपुढे मांडण्याचे काम मी केले. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात असताना झालेली मी पहिली महिला अध्यक्षा होते. त्यावेळी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व मी केले. आता मी भाजपमध्ये आल्यामुळे सत्ताधारी पक्षाची सदस्य झाले आहे. त्यामुळे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार आहे. जे प्रश्न मला गंभीर वाटले, ते मांडण्याचे काम मी आतापर्यंत केले आहे. माझ्या कुटुंबाचा याच्याशी काहीही संबंध नाही.