पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ढिगाऱ्याखालून चिमुकल्याला सुरक्षित बाहेर काढले

चिमुकल्याला वाचवले

मुंबईतल्या डोंगरी भागामध्ये इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली.  सकाळी 11 वाजून 40 मिनिटाने अचानक इमारतीचा काही भाग कोसळला. केसरबाई या 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळून यामध्ये 40 ते 50 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. याठिकाणी बचावकार्य युध्द पातळीवर सुरु आहे. आतापर्यंत 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर जखमी झालेल्या 7 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, एका चिमुकल्याला सुरक्षितरित्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.

डोंगरी दुर्घटना : अरुंद रस्त्यांमुळे बचाव कार्यास मोठा अडथळा

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. दरम्यान, ढिगाऱ्याखालून 7 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. यामध्ये एका चिमुकल्याचा देखील समावेळ आहे. या चिमुकल्याला बाहेर काढल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Dongri Building Collapses Live : दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

100 वर्ष जूनी असलेली केसरबाई या इमारतीचा काही भाग आज सकाळी अचानक कोसळला. ज्या परिसरामध्ये ही इमारत कोसळली तो परिसरातील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. जेसीबी, रुग्णवाहिकांना घटनास्थळावर येण्यासाठी अडथळे येत आहे. दरम्यान, एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मानवी साखळी तयार करुन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात मदत केली जात आहे.