पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'महाराष्ट्रासाठी आता एकच गोड बातमी, शिवसेनेचा मुख्यमंत्री'

उद्धव ठाकरे

भाजपचे नेते आणि राज्यातील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने गोड बातमी कधीही मिळेल, असे पत्रकारांना सांगत आहेत. त्यांच्या याच वक्तव्याचा वापर करून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये आता महाराष्ट्राच्या दृष्टीने एकच गोड बातमी अपेक्षित आहे ती म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ ग्रहण करणार. महाराष्ट्राच्या नशिबी एक स्वाभिमानी सरकार येणार, असे म्हटले आहे. त्याचबरोबर जर कोणी गुंडांचा धाक दाखवून आणि पैसे वाटून आमदारांची खरेदी करणार असेल तर शिवसेना तलवार घेऊन उभी आहे, असे सांगत संभाव्य घोडेबाजारावरही आमचे लक्ष असल्याचे या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.

सत्ता स्थापनेचा तिढा कायम; काँग्रेस नेते सोनिया गांधीची भेट घेणार

दोन आठवड्यानंतरही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. जनतेने शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने कौल दिलेला असला, तर सत्तावाटपावरून या दोन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. मुख्यमंत्रीपदासह सर्व मंत्रिपदांचे समसमान वाटप केले जाण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. युती करण्यापू्र्वी आपल्यात तसेच ठरले होते, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. तर भाजप मुख्यमंत्रीपद सोडण्यास अजिबात तयार नाही. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी नवे सरकार अस्तित्त्वात येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून 'सामना'मधून सातत्याने भाजपवर टीका केली जात आहे.

गुरुवारच्या अग्रलेखामध्ये भाजपच्या इतर छोट्या मित्रपक्षांवरही टीका करण्यात आली आहे. भाजप ज्या महायुतीचा विचार करीत आहे ती आकाराने मोठी असली तरी त्यात सामावलेल्या अनेकांचा स्वतःचा एकही आमदार निवडून आलेला नाही. हे सर्व बिन आमदारांचे महामंडळ राज्यपालांना भेटले असले तरी त्यांना चिंता राज्याची नसून, पुढील सरकारमध्ये आपले स्थान काय याची आहे. हे बिन आमदारांचे महामंडळ उद्या एखादे दुसरे सरकार येईल तेव्हा मागचे सर्व विसरून नव्या सरकारमध्ये सामील होईल, अशी टीका करण्यात आली आहे.

गृहनिर्माण क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय

भाजपशी हिंदुत्वाच्या विचारधारेशी काडीचा संबंध नसलेले काहीजण आमदारांशी संपर्क करून थैलीची भाषा करीत आहेत. ही राजकीय झुंडशाही महाराष्ट्राच्या शिवरायांच्या परंपरेला शोभणारी नाही, असेही अग्रलेखात म्हटले आहे.